
जिल्हास्तरीय संरक्षण समितीची बैठक 26 मे रोजी
रत्नागिरी, दि. 21 ):- माजी सैनिकांच्या कुटूंबियांना संरक्षण देण्यासाठी जिल्हास्तरीय संरक्षण समितीची मासिक बैठक पोलीस अधिक्षकांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार 26 मे रोजी दुपारी 12 वा. पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित करण्यात आली आहे. ज्या माजी सैनिकांना कौटुंबिक संरक्षण संदर्भात तक्रारी असल्यास नमूद बैठकीस आपला अर्ज व संबंधित कागदपत्रासह विहीत वेळेत उपस्थित राहावे असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी आवाहन केले आहे.




