जिल्हा कोषागार कार्यालयाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात जिल्हा कोषागार कार्यालयाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात उलाढाल केली.


रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासाचा कणा ठरलेल्या जिल्हा कोषागार कार्यालयाने नुकत्याच संपलेल्या आर्थिक वर्षात (१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६) तब्बल ३३४ कोटी ८२ लाख ६४ हजार ७३८ रुपयांची उच्चांकी आर्थिक उलाढाल केली आहे. जिल्ह्याच्या प्रगतीची चक्रे गतिमान ठेवण्यासाठी आणि प्रत्येक शासकीय यंत्रणेला बळ देण्यासाठी या अवाढव्य निधीचे अत्यंत चोख आणि पारदर्शक वितरण करण्यात आले. या आर्थिक शिस्तीमुळे सत्त्वागिरीच्या प्रगतीला मोठी गती मिळाली आहे.
जिल्हा प्रशासनाने यंदा जनतेच्या थेट आरोग्याशी आणि सुरक्षिततेशी संबंधित असलेल्या घटकांवर सर्वाधिक भर दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने आरोग्य विभागाला सर्वोच्च प्राधान्य देत १५९ कोटी ३७ लाख ४६ हजार २१६ रुपयांचा निधी सुपूर्द करण्यात आला. या भरीव तरतुदीमुळे ग्रामीण भागातील वैद्यकीय सुविधांचा चेहरामोहरा बदलण्यास, औषध पुरवठा सुरळीत करण्यास आणि जिल्हा रुग्णालयांच्या आधुनिकीकरणाला गती मिळाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button