
आंबा, काजू पाठोपाठ बदलत्या हवामानाचा सुपारी उत्पादनालाही फटका
सुपारी कोकणातील महत्वाचे पीक मानले जाते. मुबलक पाण्याची व योग्य खत व्यवस्थापन असल्यास सुपारी लागवडीनंतर सात ते दहा वर्षांनी उत्पन्न देण्यास सुरुवात करते. एका झाडाचे आयुष्य सुमारे ५० वर्षे असते आणि एका झाडापासून दरवर्षी साधारण दीड ते दोन किलो वाळलेली सुपारी मिळते. त्यामुळे अनेक शेतकर्यांनी आंबा-काजूसोबत सुपारीची लागवड वाढवली. मात्र गेल्या काही वर्षांपासून हवामानातील अस्थिरता या पिकासाठीही धोकादायक ठरत आहे.
अतिवृष्टीमुळे झाडे कमकुवत वादळे आणि अतिवृष्टीचा सुपारीच्या झाडांवर गंभीर परिणाम होत आहे. समुद्रकिनारी भागात चक्रीवादळांमुळे सुपारीची झाडे सतत हेलकावे खातात. अतिवृष्टीमुळे मुळांजवळ पाणी साचल्यास झाडे कमकुवत होतात. या परिणामाचे दुष्परिणाम दोन-तीन वर्षांनी दिसून येतात. झाडे सुकण्याचे प्रमाण वाढते. गेल्या चार-पाच वर्षांत कोकण किनारपट्टीवर आलेले सततचे वादळ आणि मुसळधार पावसाचा परिणाम आता प्रकर्षाने जाणवत असल्याचे तज्ज्ञ सांगतात.www.konkantoday.com




