मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे भीषण अपघात कार दरीत कोसळली ; एकाचा मृत्यू, पाच जखमी


मुंबई-गोवा महामार्गावर वालोपे येथील एचपी पेट्रोल पंपाजवळ आज पहाटे भीषण अपघात झाला. मुंबईहून चिपळूणच्या दिशेने जाणारी कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने थेट २५ ते ३० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात संजय जाधव यांचा जागीच मृत्यू झाला असून पाच जण जखमी झाले आहेत.

ही घटना पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी संस्थानची रुग्णवाहिका काही मिनिटांत घटनास्थळी दाखल झाली. बचाव पथकाने तातडीने दरीत उतरून जखमींना बाहेर काढले. त्यानंतर सर्व जखमींना उपचारासाठी चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

या अपघातात अप्रिन सावंत, रिधा मोडक, उजेर मुल्ला, रिया मुल्ला आणि आईल मुल्ला हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत. अपघातामुळे काही काळ मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button