रत्नागिरी विमानतळ अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू


कोकणातील दळणवळण यंत्रणा अधिक मजबूत करण्यासाठी आणि पर्यटनाला नवी दिशा देण्यासाठी रत्नागिरी विमानतळ अद्ययावत करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. विमानतळाचे काम विहित मुदतीत आणि पूर्ण क्षमतेने पूर्ण करण्यासाठी हे काम अधिक गतिमान करण्याचे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी यावेळी दिले.
रत्नागिरी विमानतळ हा केवळ एक पायाभूत प्रकल्प नसून, तो संपूर्ण कोकणच्या आर्थिक आणि पर्यटन विकासाचा कणा ठरणार आहे. हिच बाब लक्षात घेऊन पालकमंत्री सामंत यांनी कामाच्या गुणवतेची आणि गतीची बारकाईने पाहणी करत लक्ष ठेवलेले आहे. विमानतळ अद्ययावत करताना तांत्रिक मंजुरी, भूसंपादन आणि धावपट्टीच्या विस्तारीकरणाचे काम वेगाने पूर्ण व्हावे, यासाठी त्यांनी उपस्थित वरिष्ठ अधिकार्‍यांना ऑन द स्पॉट’ आवश्यक त्या महत्वपूर्ण सूचना नुकत्याच दिल्या.
पालकमंत्री उदय सामंत यांनी विमानतळावर उपस्थित राहून सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी अलिकडेच केली होती. कामात कुठेही दिरंगाई नको, असेही त्यांनी स्पष्ट केले होते. यावेळी जिल्हा प्रशासनातील सपूर्ण वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी विमानतळ पूर्ण क्षमतेने सुरू झाल्यास मुंबई रत्नागिरी थेट जोडली जाईल. यामुळे देश-विदेशातील पर्यटक थेट कोकणात येऊ शकतीत, फायदा स्थानिक व्यावसायिक, हापूस बागायतदार आणि हॉटेल उद्योगाला होईल.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button