राजापूर शहरात रस्ते खोदून ठेवणार्‍या ठेकेदाराला जिल्हाधिकार्‍यांनी फटकारले


पाण्याच्या नव्या डीपीआर अंतर्गत राजापूर शहरात रस्ते खोदून ठेवणार्‍या संबंधित ठेकेदाराला जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी चांगलेच फटकारले आणि आगामी सात दिवसांत कामाचा आराखडा सादर करण्याचे आदेश देत ३१ मे पूर्वी खोदलेले रस्ते पूर्वस्थितीत करण्याचे आदेश दिले. अन्यथा कारवाई आणि ठेकाच रद्द करण्यात येईल असा इशाराही देण्यात आला आहे.
शहरासाठी मंजूर झालेल्या नवीन नळपाणीपुरवठा योजनेच्या डीपीआर कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व निकृष्ट काम होत असल्याची शहरवासीयांची कैफियत नगरसेवक महेश शिवलकर यांनी जनता दरबारात निवेदनाद्वारे आमदार किरण सामंत व जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे मांडली होती.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button