
रत्नागिरी हापूस आंब्याने सातासमुद्रापार लंडनच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व राखले.
कोकणचा राजा मानल्या जाणार्या रत्नागिरी हापूस आंब्याने सातासमुद्रापार लंडनच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम राखले असले, तरी यंदा या फळाचा गोडवा चाखणे लंडनवासियांसाठी महागडे ठरत आहे. हवामानातील बदल आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाहतूक कोंडीमुळे लंडनमध्ये हापूसचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, किमतींनी उच्चांक गाठला आहे.
दक्षिण लंडनमधील ’टूटिंग’ आणि ’साऊथॉल’ यांसारख्या भारतीय बहुल भागांतील बाजारपेठांमध्ये हापूस आंब्याला मोठी मागणी असते. मात्र, सध्या या बाजारपेठांमध्ये हापूसच्या एका बॉक्सची (साधारण ६ ते १२ आंबे) किंमत १५ पाउंड ते २२ पौंड (अंदाजे १,५०० ते २,३०० भारतीय रुपये) पर्यंत पोहोचली आहे. काही उच्च दर्जाच्या स्टोअर्समध्ये ही किंमत यापेक्षाही अधिक आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत ही दरवाढ आंबा खरेदी करताना खिसा रिकामा लक्षणीय असून, सामान्य ग्राहकांना करावा लागत आहे.
www.konkantoday.com



