सकाळचा नाश्ता म्हणजे निरोगी आरोग्याचं औषध! आरोग्यासाठी घातक असलेले ‘हे’ पदार्थ टाळा!

Breakfast is the best medicine : आयुर्वेद आणि आधुनिक विज्ञान या दोन्हींचा असा विश्वास आहे की, आपल्या उत्तम आरोग्याचा मार्ग आपल्या पोटातून जातो. तुम्हाला हे माहीत आहे का की, तुम्ही दररोज आरोग्यदायी नाश्ता समजून जे काही खाता, ते प्रत्यक्षात तुमची चयापचय क्रिया मंद करीत असते.

त्या अयोग्य आहारामुळे वायू सरणे आणि आम्लपित यांसह रोगप्रतिकार शक्ती आणि मानसिक आरोग्यावरही विपरीत परिणाम होतो. तज्ज्ञांच्या मते, नाश्ता हा दिवसातील सर्वांत महत्त्वाचा भाग आहे. कारण- रात्रभर उपाशी राहिल्यानंतर शरीर नाश्त्यातील पोषक तत्त्वे उत्तम प्रकारे शोषून घेते. सकाळी चुकीचे पदार्थ खाल्ल्याने रक्तातील साखरेची पातळी वाढणे, इन्सुलिन प्रतिरोध, आतड्यांना सूज येणे यांसारख्या समस्या उदभवू शकतात.

नवी दिल्लीतील वसंत कुंज येथील आयएसआयसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमधील डॉ. शुभम वात्स्य सांगतात की, नाश्ता आपल्या सर्वांसाठी आवश्यक आहे. सुमारे १०-१२ तास उपवास केल्यानंतर सकाळी शरीराची चयापचय क्रिया अधिक सक्रिय झालेली असते. या काळात अन्नाचे पचन करणारे घटक अधिक चांगल्या प्रकारे कार्य करतात आणि शरीर पोषक तत्त्वे अधिक शोषून घेते. त्यामुळे नाश्ता केवळ पोट भरण्यासाठी नव्हे, तर यांचे आरोग्य हार्मोनल संतुलन आणि ऊर्जेसाठीही महत्वाचा मानला जातो. चला तर मग, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया की, नाश्त्यामध्ये कोणते पदार्थ खावेत आणि आरोग्य चांगले राखण्यासाठी कोणते पदार्थ टाळावेत?

आरोग्यदायी नाश्ता का महत्त्वाचा

आरोग्यदायी नाश्ता केल्याने तुमची पचनक्रिया सुधारते आणि वायू सरणे, आम्लपित्त व पोटफुग यांसारख्या त्रासांपासून बचाव होतो. नाश्त्यामध्ये आरोग्यदायी पदार्थ खाल्ल्याने तुमची ऊर्जा पातळी टिकून राहते. आरोग्यदायी पदार्थ वारंवार लागणारी भूक टाळण्यास मदत करतात आणि तुमच्या आतड्यांमधील सूक्ष्मजीवांने संतुलन सुधारतात. आरोग्यदायी नाश्ता तुमच्या चयापचयाला चालना देतो.

आरोग्यासाठी घातक असलेला नाश्ता

रिकाम्या पोटी चहा आणि बिस्किटे खाऊ नका

रिकाम्या पोटी चहामधील कॅफिनमुळे अॅसिडिटी वाढू शकते. बिस्किटांमध्ये रिफाईंड पीठ, रिफाईंड साखर व पाम तेल यांसारखे प्रक्रिया केलेले घटक असतात, जे आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात.

ब्रेड बटर आणि जॅमपासून दूर राहा

पांढऱ्या किंवा पांढऱ्या किंवा तपकिरी ब्रेडमध्ये अनेकदा प्रक्रियायुक्त पीठ आणि पदार्थ टिकवणारे घटक असतात. जॅममध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. या मिश्रणामुळे रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते आणि लगेच पुन्हा भूक लागू शकते.

फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्स आणि पॅक केलेली मुसली

फ्लेवर्ड कॉर्नफ्लेक्स आणि पॅक केलेल्या मुसळीमध्ये उच्च प्रमाणात साखर, कृत्रिम स्वाद आणि प्रक्रिया केलेली कर्बोदके जास्त प्रमाणात असतात. ते पदार्थ आरोग्यदायी आहेत, असे समजून त्यांचे सेवन केल्यास इन्सुलिनची पातली अचानक वाढू शकते.

तळलेले पदार्थ

मेदू वडा, वडापाव, समोरा, पुरी, कचोरी, छोले-भटुरे यांसारखे तळलेले पदार्थ सकाळी खाणे त्रासदायक ठरू शकतात. त्यामुळे पोटफुगीचा त्रास होऊ शकतो.

नाश्त्यात फक्त फळे खाणे

केवळ फळ किया फळांचा रस प्यायल्याने शरीराला पुरेशी प्रथिने आणि आरोग्यदायी चरबी मिळत नाही. त्यामुळे पुन्हा लवकर भूक लागू शकते आणि रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते.

आतड्यांच्या आरोग्यासाठी काय खावे?

मुगाच्या डाळीचा चिल्ला आणि दही खा

आरोग्यदायी नाश्त्यामध्ये फायबर, प्रथिने, प्रो-बायोटिक्स हे घटक असलेले पदार्थ असावेत. त्यामुळे नाश्त्यामध्ये मूग आणि दही खावे. मूग हे सहज पचणारे कडधान्य मानले जाते. त्यामध्ये प्रथिने आणि फायबर दोन्ही असतात. दही एक प्रो-बायोटिक म्हणून आतड्यांच्या आरोग्यास मदत करू शकते.

इडली, नारळाची चटणी आणि ताक

इटली हा एक आंबवलेला पदार्थ आहे, जो पचायला सोपा मानला जातो. नारळाच्या चरणीतून आरोग्यदायी चरबी मिळते. तर ताकातील घटक आतड्यांतील मायक्रोबायोमसाठी पोषक ठरू शकतात.

बाजरी किंवा ज्वारीचा उपमा

बाजरी आणि ज्वारी यांसारख्या भरडीच्या धान्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते आणि ती ग्लुटेनमुक्त असतात. त्यामुळे बद्धकोष्ठता कमी होण्यास आणि पोट जास्त वेळ भरलेले राहण्यास मदत होते.

नाचणी डोसा

नाचणीमध्ये कॅल्शियम, लोह आणि रेझिस्टंट स्टार्च आढळतात, जे आतील जीवाणूंसाठी फायदेशीर मानले जाते.

मूग डाळ खिचडी

तूप आणि दह्याबरोबर मूग डाळ खिचडी हलकी आणि सहज पचणारी मानली जाते. पोटाच्या त्रासातून सुटका आणि आतड्यांच्या आरोग्यासाठी हा एक चांगला पर्याय असू शकतो.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button