हापूसच्या नावाखाली कर्नाटक आंब्याची विक्री, स्थानिकआंबा व्यावसायिकांमध्ये नाराजी


रत्नागिरी जिल्ह्याची ओळख असलेल्या प्रसिद्ध हापूस आंब्याच्या नावाखाली कर्नाटकातून आलेल्या आंब्यांची खुलेआम विक्री होत असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. रत्नागिरी हापूस म्हणून पर्यटकांना कर्नाटकचा आंबा विकला जात असल्याने पर्यटकांच्ची फसवणूक होत असून, यामुळे स्थानिक बागायतदार आणि व्यापार्‍यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे कर्नाटकी आंब्याच्या वाढत्या आवकामुळे स्थानिक हापूसचे दर कोसळले असून कॅनिंग व्यवसायावरही मोठा परिणाम झाला आहे.
सध्या मे महिन्याच्या सुट्टया सुरू असल्याने कोकणात पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी वाढली आहे. मुंबई, पुणे आणि राज्यातील विविध भागांमधून चाकरमानी व पर्यटक रत्नागिरीत दाखल होत आहेत. कोकणातील निसर्ग, समुद्रकिनारे, ताज मासे आणि रत्नागिरीचा हापूस आंबा हे पर्यटकांचे मुख्य आकर्षण असते. मात्र याच हापूसच्या नावाखाली बाहेरून आलेल्या आंब्यांची विक्री करून ग्राहकांची फसवणूक केली जाते.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button