रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे भाजून जखमी झालेल्या तरुणीचा मृत्यू


रत्नागिरी तालुक्यातील नाखरे येथे चुलीवर जेवण करताना भाजलेल्या तरुणीचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. लक्ष्मी हल्लेप्पा बुदिहल (वय २३, रा. जयहनुमान चौक ता. सिंदगी, जि. विजयपूर कर्नाटक, सध्या रा. बोरभाटले-नाखरे, रत्नागिरी) असे तरुणीचे नाव आहे. ही घटना बुधवारी दुपारी २.३० सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली.
लक्ष्मी हिने आपल्या राहत्या घरी चुलीवर कुकरमध्ये डाळ शिजवायला टाकली होती. चुलीवरिल कुकर उचलत असताना तिला चक्कर आली. कुकर मधील डाळ तोंडावर व हातावर पडली. त्यात ती जखमी झाली. तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासून घोषित केले.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button