खेड शहरातीलील स्वरुपनगर येथे बंद फ्लॅट फोडून ऐवज लांबविला


खेड शहरातील स्वरुपनगर येथील नील हाईटस् इमारतीतील बंद फ्लॅट फोडल्याचा प्रकार बुधवारी सकाळी उघडकीस आला. चोरट्याच्या हाती मौल्यवान दागिने लागले नसले तरी ७ ते ८ हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे समोर आले आहे. याबाबत सचिन विनरकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. बंदावस्थेतील फ्लॅटच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्याने आतमध्ये प्रवेश केला. कपाटातील साहित्य पसरवत दागिन्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र दागिने चोरट्यांच्या हाती लागले नाहीत. रहदारीच्या व उच्चभ्रू वस्तीत झालेल्या घरफोडीच्या प्रयत्नाने एकच खळबळ उडाली आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button