
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे जागतिक डेंग्यू दिवसानिमित्त मार्गदर्शन
प्राथमिक आरोग्य केंद्र मालगुंड येथे जागतिक डेंग्यू दिवसानिमित्त जनजागृती व मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात आरोग्य सहाय्यक डॉ परशुराम निवेंडकर यांनी नागरिकांना डेंग्यू आजाराची लक्षणे, प्रतिबंधात्मक उपाययोजना तसेच परिसर स्वच्छतेचे महत्त्व याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.
वैद्यकीय अधिकारी डॉ सुनीता पवार यांनी डेंग्यू हा डासांमुळे पसरणारा आजार असून घराच्या परिसरात पाणी साचू न देणे, पाण्याच्या टाक्या झाकून ठेवणे, आठवड्यातून एक दिवस “ड्राय डे” पाळणे तसेच पूर्ण बाह्यांचे कपडे वापरणे यासारख्या उपाययोजना करण्याचे आवाहन केले.
यावेळी आरोग्य कर्मचाऱ्यांनी नागरिकांना डेंग्यूची लक्षणे जसे ताप, अंगदुखी, डोकेदुखी, त्वचेवर पुरळ दिसल्यास त्वरित आरोग्य केंद्राशी संपर्क साधण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, ग्रामस्थ आणि स्थानिक नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कार्यक्रमाच्या माध्यमातून डेंग्यू प्रतिबंधासाठी सामूहिक सहभागाची गरज अधोरेखित करण्यात आली.



