
’कोकणचा राजा हापूस’ इंदोरकरांच्या भेटीला तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन
मध्य प्रदेशची मिनी मुंबई म्हणून ओळखल्या जाणार्या इंदोर शहरात सध्या कोकणच्या राजाचे म्हणणजेच हापूस आंब्याचे आगमन झाले असून मँगो जत्रा २०२६ मुळे शहरात चैतन्याचे वातावरण आहे. महाराष्ट्र सोशल ग्रुप ट्रस्ट आणि हिप्पो कॉर्पोशन यांच्या वतीने इंदूरच्या ग्रामीण हाट बाजार परिसरात या तीन दिवसीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
१० मेपर्यंत चालणार्या या महोत्सवाचे हे १४ वे वर्ष असून, याचे उदघाटन मोठ्या उत्साहात पार पडले. या जत्रेमुळे इंदोरकरांना थेट कोकणच्या बागांतील नैसर्गिकरीत्या पिकलेला आणि रसाळ हापूस आंबा चाखायला मिळत आहे.www.konkantoday.com




