संगमेश्‍वर तालुक्यातील मेढे-फुणगूस रस्त्याची अवस्था भयावह


संगमेश्‍वर तालुक्यातील मेढे तर्फे फुणगूस राई-भातगांव मार्गाची अवस्था भयावह बनत चालली असून प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे ग्रामस्थांना अक्षरशः जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. रस्त्यावरील खड्डे, पसरलेली लाल माती आणि दोन ते तीन वर्षांपासून रखडलेले पुलाचे अर्धवट काम यामुळे हा मार्ग आता अपघातांना खुले आमंत्रण देत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. या रस्त्यावरून दररोज शाळकरी विद्यार्थी, कामगार, ग्रामस्थ तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. मात्र प्रशासन आणि संबंधित ठेकेदाराच्या हलगर्जीपणामुळे दुचाकीस्वारांचे हाल बेहाल झाले आहेत.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button