रत्नागिरीतील पर्ससीन नौकांना सिंधुदुर्गात भयानक वागणूक, मच्छिची लूट


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सागरी हद्दीत मच्छीमारीसाठी जाणार्‍या रत्नागिरीतील पर्ससीन नेट नौकांना तिथे भयावह अनुभवांना सामोरे जावे लागत आहे. सिंधुदुर्गातील काही नौकांकडून रत्नागिरीच्या नौकांना घेराव घालून त्यांची मासळी जबरदस्तीने हिसकावून घेणे आणि खलाशांना मारहाण करण्याचे प्रकार वाढले आहेत. या गंभीर पार्श्वभूमीवर रत्नागिरीतील मच्छीमार संघटनांनी आक्रमक पवित्रा घेतला असून, आता अशा कृत्यांना जशास तसे उत्तर देण्याचा निर्णय घेतला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून रत्नागिरीच्या समुद्रकिनार्‍यावर मासळी मिळेनाशी झाली आहे. यामुळे नौकांचा डिझेलचा खर्चही निघणे कठीण झाले आहे. बहुसंख्य पर्ससीन नेट नौका मालक मोठ्या आर्थिक अडचणीत सापडले आहेत. या विवंचनेतून मार्ग काढण्यासाठी रत्नागिरीतील अनेक नौका सिंधुदुर्गच्या समुद्रात मासेमारीसाठी जात आहेत. मात्र, तिथे रत्नागिरीच्या नौका दिसताच स्थानिक काही नौकांकडून टोळक्याने येऊन दहशतीचे वातावरण निर्माण केले जात असल्याचे येथील मच्छीमारांतून त सांगितले जात आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button