सीएसआर निधीतून पाली येथील ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण


एसबीआय फाऊंडेशन आणि एसबीआय मुच्युअल फंड यांच्या सीएसआर निधीतून पाली येथील ग्रामीण रुग्णालयाचे नूतनीकरण करण्यात आले आहे. या अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज रुग्णालयाचे लोकार्पण राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री तथा रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी बोलताना मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, शासकीय प्रयत्नांना सारख्या संस्थांच्या निधीची जोड मिळाल्यास सामान्य नागरिकांपर्यंत दर्जेदार सुविधा पोहोचवणे अधिक सुलभ होते. पाली व परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना आता तत्काळ आणि गुणवत्तापूर्ण उपचार मिळण्यास मदत होणार असून आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच अशा सामाजिक सहभागाला शासनाकडून नेहमीच प्रोत्साहन दिले जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
या नूतनीकरणामुळे रुग्णालयात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या असून, रुग्णसेवा अधिक परिणामकारक आणि दर्जेदार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. लोकार्पण सोहोळ्याला जिल्ह्यातील स्थानिक आमदार, जिल्हा परिषदेचे पदाधिकारी, स्थानिक ग्रामपंचायतीचे सरपंच व सदस्य, जिल्हाधिकारी मनुज जिंदल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. भास्कर जगताप, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी, पाली ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक, कर्मचारीवर्ग तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button