
रत्नागिरी शहरातील राजिवडा जवळ राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीची गळफास लावून आत्महत्या
रत्नागिरी शहरातील राजिवडा येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने रहात्या घरात वाशाला ओढणीने गळफास घेतला. उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून मृत घोषित केले.अर्चना दिपक बोन्द्रे ( १६, रा. राजीवडा-टेक्निकल हायस्कूल जवळ भाड्याने, रत्नागिरी) असे मृत अल्पवयीन मुलीचे नाव आहे. ही घटना दुपारी 13.30 वा.सुमारास जिल्हा रुग्णालयात घडली. अल्पवयीन अर्चना बोंद्रे हीने कोणत्यातरी अज्ञात कारणातून घरातील वाशाला ओढणीने गळफास घेतला. ही बाब तिच्या बहिणीच्या लक्षात येताच तातडीने तिला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले मात्र तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून मृत घोषित केले.




