संगमेश्वर रुग्णालयाचेच ’आरोग्य धोक्यात


संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयासह अपघातग्रस्तांसाठी अत्यावश्यक सेवा देणार्‍या ट्रामा केअर सेंटरमध्ये डॉक्टरांचीच पदे मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याने आरोग्य यंत्रणा गभीर अवस्थेत पोहोचली आहे. वैद्यकीय अधिक्षक, वैद्यकीय अधिकारी यासारख्या महत्त्वाच्या पदासह तब्बल १० पदे रिक्त असून, या परिस्थितीमुळे रुग्णालयाचा कारभार कोलमडला आहे.
संगमेश्वर परिसरातील सुमारे ९५ गावासाठी हे ग्रामीण रुग्णालय महत्त्वाचा आधार आहे. तसेच मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली ते बावनदी या सुमारे ४० किलोमीटरच्या अपघातप्रवण पट्ट्यातील जखमींवर तातडीने उपचार व्हावेत यासाठी अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. मात्र अनेक वर्षापासून येथे आवश्यक वैद्यकीय अधिकार्‍यांची पदे रिक्त असल्याने या सुविधांचा पुरेपुर लाभ रूग्णांना मिळत नाही.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button