सरस्वती डान्स अकॅडमी प्रस्तुत “स्वामी नृत्यांजली” कार्यक्रम

स्वा. वि. दा. सावरकर नाट्यगृह मध्ये 2 मे 2026 रोजी नुकताच यशस्वी पणे पार पडला. श्री रमेश कसबेकर साहेब, रिटायर्ड चीफ मॅनेजर ऑफ इंडियन ऑइल, महारत्न कंपनी ऑफ Govt ऑफ इंडिया आणि समाज सेवक यांच्या हस्ते नटराज व स्वामी पूजन आणि दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात झाली. या कार्यक्रमाला आपल्या लाडक्या नगराध्यक्षा सौ. शिल्पा सुर्वे मॅडम, नगरसेविका सौ. मेधा कुलकर्णी मॅडम, नगरसेविका व महिला बालकल्याण सभापती सौ. प्रीती सुर्वे मॅडम , माजी सरपंच श्री भिकाजी गावडे सर यांनी या कार्यक्रमा मध्ये प्रमुख उपस्थिती दर्शवली. तसेच कु. श्रुती शिंदे मॅडम (भरतनाट्यम नृत्यविषारद) यांनी गेस्ट डान्स प्रस्तुत केला. या सर्व पाहुण्यांचा सरस्वती डान्स अकॅडमी च्या संचालिका सौ स्नेहल कळंबटे नागले मॅडम (BSc (Maths), BEd, Bharatnatyam नृत्याविषारद) आणि श्री विक्रम नागले सर (M.E.Mechanical ) यांच्या हस्ते या सर्व प्रमुख पाहुण्यांचे सत्कार करण्यात आले. रत्नागिरीमध्ये पहिल्यांदाच “श्री स्वामी समर्थ यांच्यावर आधारित भरतनाट्यम नृत्याविष्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री. मंदार शिंदे यांनी केले.

तसेच पालकांपैकी सौ. स्वरा सावंत मॅडम, सौ. वीणा शिंदे मॅडम आणि सौ. शर्वरी कदम मॅडम यांनी हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी मोलाची मदत केली.
हा कार्यक्रम सुंदर रित्या पार पडल्याने सर्व पाहुण्यांनी आणि प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केले.
तसेच भविष्यात असे नाविन्यपूर्ण कार्यक्रमांचे आयोजन करून प्रस्तुत करण्याचे आवाहनही केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button