
सनगरेवाडी येथे मद्यपान करणाऱ्याविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी : तालुक्यातील कोतवडे-सनगरेवाडी येथील सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दत्ताराम देवजी परकर (वय ५९, रा. सनगरेवाडी, कोतवडे-रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (ता. १) रात्री आठच्या सुमारास सनगरेवाडी बस स्टॉप मागील बाजूस निदर्शनास आली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित दत्ताराम परकर हे सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करत असताना निदर्शनास आले. या प्रकरणी महिला पोलिस कॉन्स्टेबल प्राजक्ता भोते यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.




