
बंदरातील नौकांचे सांगाडे, अवशेष नौकामालकांनी हटवावेत
रत्नागिरी, दि. 30 ) : मिरकरवाडा मत्स्य बंदरात बंद, विनावापर, मोडलेल्या स्थितीत असलेल्या, बुडालेल्या व नष्ट झालेल्या नौकांचे इंजिन व इतर पार्ट्स काढून घेऊन कोणतेही मूल्य न येणारे असे नौकांचे सांगाडे/ अवशेष बंदरात सोडून दिलेले आहेत. यामुळे नौकानयनासाठी अडथळा होत आहे. बंदरातील जागा अनावश्यकरित्या व्यापली गेली आहे. हा अडथळा मच्छीमारी नौकांसाठी धोकादायक झाला आहे. तरी सदरच्या नौका/सांगाडे/अवशेष संबंधित नौकामालकांनी दिनांक 8 मे पर्यंत बंदरातून स्वखर्चाने काढून टाकावेत, अन्यथा या नौका मत्स्यव्यवसाय विभागामार्फत काढून टाकण्यात येतील व संबंधित नौकामालकांना कोणत्याही नुकसान भरपाईचा दावा करता येणार नाही व होण्याऱ्या कारवाईचा खर्च संबंधितांकडून वसूल करण्यात येईल याची संबंधितांनी नोंद घेण्याबाबत मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.




