मुंबईचा राजा रोहित शर्मा कोट्यवधींच्या साम्राज्याचा मालक! IPLमधून केलीये तब्बल १९५ कोटींची कमाई; एकूण संपत्ती ऐकून चक्कर येईल!

Rohit Sharma Net Worth : ‘मुंबईचा राजा’ आणि टीम इंडियाचा सर्वात यशस्वी कर्णधार रोहित शर्मा आज (३० एप्रिल) आपला ३९ वा वाढदिवस साजरा करत आहे. टी-२० विश्वचषक २०२४ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ या दोन ऐतिहासिक विजयांचे शिल्पकार असलेल्या रोहितने क्रिकेटच्या मैदानासोबतच आर्थिक क्षेत्रातही आपले एक वेगळे साम्राज्य निर्माण केले आहे.

हिटमॅन सध्या दुखापतीमुळे मुंबई इंडियन्सकडून सामने खेळताना दिसत नाहीये. रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाल्याने तो अजून काही सामन्यांना मुकण्याची शक्यता आहे. कर्णधार आणि म्हणून त्यानेआयपीएल आणि भारतीय संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिलं आहे. वर्षभराच्या कालावधीत भारतीय संघाला दोन आयसीसी जेतेपदं पटकावून देणारा कर्णधार म्हणून त्याची ओळख आहे.

भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वाखाली भारताने टी-२० विश्वचषक २०२४ चं जेतेपद पटकावलं. या विजयासह भारताने ११ वर्षांचा आयसीसी ट्रॉफीचा दुष्काळ संपवला. टी-२० विश्वचषक विजयानंतर रोहितने टी-२० क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५वर देखील भारताने आपलं नाव कोरलं. या विजयानंतर काही दिवसांनी रोहितने कसोटी क्रिकेटला अलविदा केलं. रोहित शर्माचं नेटवर्थ किती आहे, जाणून घेऊया.

२०२५-२६ कालावधीत रोहित शर्मा हा जागतिक क्रिकेटमध्ये एक श्रीमंत खेळाडू म्हणून उदयास आला आहे. त्याची एकूण संपत्ती सुमारे २१४ कोटी ते २३० कोटी (सुमारे २८ दशलक्ष अमेरिकी डॉलर) इतकी असल्याचा अंदाज आहे. विराट कोहली आणि एम एस धोनी यांसारख्या दिग्गजांच्या तुलनेत तो थोडा मागे असला, तरी रोहितने स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य उभं केलं आहे. विशेष म्हणजे, मुंबई इंडियन्ससोबतच्या दशकभराच्या यशस्वी कारकिर्दीतून त्याने आयपीएलमधूनच सुमारे १९५ कोटींची कमाई केली आहे.

रोहित शर्माची एकूण संपत्ती किती?

ताज्या आकडेवारीनुसार रोहित शर्माची एकूण संपत्ती सुमारे २१४ ते २१८ कोटी इतकी मानली जाते. काही अभ्यासांनुसार, रिअल इस्टेट आणि दीर्घकालीन गुंतवणुकीचा पूर्ण विचार न करता हा आकडा २३० कोटींपर्यंत जाऊ शकतो. ही रक्कम त्याचे करार, ब्रँड डील्स, मालमत्ता आणि डिजिटल प्लॅटफॉर्मवरील कमाई यांच्या आधारे अंदाजे मोजली जाते. म्हणजेच, ही अधिकृत निव्वळ संपत्तीची (net worth) अचूक नोंद नसून क्रीडा-आर्थिक आणि सेलिब्रिटी मूल्यांकन करणाऱ्या संस्थांनी दिलेला एक अंदाजित पट्टा आहे. रोहित शर्माची संपत्ती ही या तीन स्तंभांवर आधारित आहे, ज्यामध्ये बीसीसीआयचे करार, सामन्यांची फी आणि आयपीएलमधील कमाई अशी आहे.

BCCI सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट पगार

रोहित शर्माला बीसीसीआयच्या करार संरचनेत A+ श्रेणीतून आता रोहित शर्मा ब श्रेणीत गेला आहे, ज्याअंतर्गत त्याला दरवर्षी सुमारे ३ कोटींच्या जवळपास पगार मिळतो. खेळातील एकूण कामगिरी आणि योगदानावर आधारित ही रक्कम दिली जाते.

सामन्यांची फी

रोहित शर्मा फक्त वनडे सामने खेळत असल्याने त्याला हे सामने खेळण्यासाठी ६ लाख रूपये मिळतात.

आयपीएल कमाई

रोहित शर्माने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना गेल्या अनेक वर्षांत मोठी कमाई केली आहे. त्याच्या दीर्घ आणि यशस्वी कारकिर्दीमुळे आयपीएल हे त्याच्या उत्पन्नाचे एक महत्त्वाचे स्रोत ठरले आहे. आयपीएल २०२५ आणि २०२६ हंगामात त्याचा करार प्रति हंगाम सुमारे १६.३ कोटी इतका असून, त्यामुळे तो संघातील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये गणला जातो. आतापर्यंतच्या १८ आयपीएल हंगामांमध्ये रोहितने सुमारे १९०-१९५ कोटी इतका पैसा कमावला आहे, जो त्याच्या एकूण संपत्तीचा मोठा हिस्सा आहे.

रोहित शर्माची ब्रँड आणि जाहिरातीतून कमाई

मैदानावरील कामगिरीव्यतिरिक्त रोहित शर्माची खरी आर्थिक ताकद म्हणजे त्यांचे ब्रँड एंडोर्समेंट्स आहेत. २०२५ पर्यंत तो २५-२६ पेक्षा अधिक मोठ्या ब्रँड्सशी जोडला गेला आहे. यात स्पोर्ट्सवेअर, FMCG, तंत्रज्ञान, वित्त, प्रवास आणि ऑटो क्षेत्रातील कंपन्यांचा समावेश आहे. रोहित शर्मा यांच्याशी संबंधित प्रमुख ब्रँड्सची नावे, अॅडिडास (Adidas), ओरल-बी इंडिया (Oral-B India), इक्सिगो (Ixigo), मॅक्स लाईफ इन्शुरन्स (Max Life Insurance), हब्लोट (Hublot), रसना (Rasna), स्विगी (Swiggy), सीएट (CEAT), नॉईज (Noise), न्यू एरा (New Era), ओक्ले (Oakley), आयआयएफएल फायनान्स (IIFL Finance), निसान (Nissan), गोइबिबो (Goibibo), बिर्ला सन लाईफ इन्शुरन्स (Birla Sun Life Insurance), इन्फिनिटी लर्न (Infinity Learn), मॅसिमो बॅटरीज (Massimo Batteries) आणि वेगा (Vega). या मोठ्या ब्रँड डील्समुळे रोहित शर्माच्या कमाईत मोठी भर पडते आणि त्याच्या एकूण संपत्तीमध्ये याचा महत्त्वाचा वाटा आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button