महाराष्ट्रात रिक्षाचालकांच्या मराठी सक्तीला मुदतवाढ


महाराष्ट्र दिनापासून टॅक्सी – रिक्षा चालकांसाठी मराठी भाषा बोलता येण्याच्या सक्तीला मुदतवाढ देण्यात आली आहे. मात्र चालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे, या निर्णयावर परिवहन विभाग ठाम असल्याचे मंत्री प्रताप सरनाईक यांनी माध्यमांसमोर बोलताना सांगितले.
गेल्या काही दिवसांपासून मुंबईसह संपूर्ण राज्यात रिक्षा आणि टॅक्सी चालकांसाठी मराठी भाषा अनिवार्य करण्याच्या मुद्यावरून वाद निर्माण झाला होता. शिंदे सेनेचे नेते संजय निरुपम यांनी त्याला तात्विक विरोध केला होता.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button