चिपळूण, खेडमध्ये‌ २ व ३ मे रोजी शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व्याख्यान

चिपळूण : कोकणातील जास्तीत जास्त विद्यार्थी शासनाच्या विभागात विविध पदांवर प्रशासकीय सेवेत यावेत यासाठी कोकणचे सुपुत्र आणि केंद्रीय वस्तू तसेच सेवा कर (मुंबई) विभागाचे वरिष्ठ अनुवाद अधिकारी सत्यवान यशवंत रेडकर खेड व चिपळूण येथे निःशुल्क शासकीय स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन करणार आहेत. २ मे सकाळी ११ वाजता, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन, एल. पी. स्कूलच्या बाजूला, खेड एसटी स्टँड जवळ (ता. खेड) सायंकाळी ४ वाजता नाभिक समाज सभागृह, खेर्डी, माळीवाडी (ता. चिपळूण) तसेच ३ मे रोजी सकाळी ८.३० वाजता ग्रामसेवक भवन, कापसाळ (ता. चिपळूण) व दुपारी ३.३० वा., श्री राधाकृष्ण मंदिर, खांदाट, गवळवाडी (ता. चिपळूण) येथे होणार आहे.

जास्तीत जास्त विद्यार्थी व पालकांनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा. व्याख्यानासाठी कोणतेही नोंदणी शुल्क नाही, फक्त वही व पेन सोबत असू द्यावे. कोणत्याही वैयक्तिक सबबी न देता कोकणातून जास्तीत जास्त अधिकारी घडवण्यासाठी स्वतः विद्यार्थ्यांसहित उपस्थित रहावे, अधिक माहितीसाठी सत्यवान रेडकर (९९६९६५७८२०) या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button