
भारत की पाकिस्तान या वादात एलपीजी गॅस वाहू जहाज अडकले जयगड बंदरात
दोन मालकांच्या इर्षेमुळे १८०० मेट्रीक टन एलपीजी गॅसने भरलेले एक जहाज रत्नागिरीतील जयगड बंदराबाहेर अधांतरी लटकले आहे. या वादाचे केंद्र ठरले आहे भारत की पाकिस्तान हे दोन देश. ज्यामुळे हे जहाज सध्या ना घरचे राहिले आहे ना घाटचे.
हे संपूर्ण प्रकरण ओमन येथून सुरू झाले. ओमनमधून निघालेले हे जहाज १८०० मेट्रीक टन एलपीजी गॅस घेवून रत्नागिरीच्या जयगड बंदराच्या दिशेने रवाना झाले होते. सर्व काही सुरळीत सुरु असताना अचानक या जहाजाच्या दोन मालकांमध्ये अंतर्गत ठिणगी पडली. एका मालकाची ठाम भूमिका आहे की हा गॅस भारतीय बाजारपेठेसाठी आहे आणि तो जयगड बंदरातच उतरवला जावा. मात्र दुसर्या मालकाचा ओढा हा गॅस पाकिस्तानला नेण्याकडे आहे. मालकांच्या या व्यावसायिक रस्सीखेचामुळे हे जहाज आता भारताच्या सागरी सीमेजवळ अडकून पडले आहे. या विचित्र वादामुळे जहाजाच्या कायदेशीर प्रक्रियेचा पुरता बोजवारा उडाला आहे.www.konkantoday.com




