
शिक्षकांचे मार्च, एप्रिलचे वेतन रखडले, शिक्षकांच्यात नाराजी
संचमान्यता आणि शालार्थ प्रणालीमध्ये पदांच्या संख्येत फरक असल्याने संबंधित कॉलेजची पगार बिले रत्नागिरी वेतन अधीक्षकांना फॉरवर्ड न होता थेट कोल्हापूर उपसंचालक यांच्या लॉगिनला गेली. ही बाब गेले सहा महिने घडत आहे. ही बिले कोल्हापूरहून मंजूर करून पुन्हा मुख्याध्यापक लॉगिनला आल्यावर ती पुन्हा वेतन अधीक्षक कार्यालयात फॉरवर्ड करावी लागतात. ही संपूर्ण प्रक्रिया वेळेत आणि कालमर्यादेत शासकीय यंत्रणेने राबवणे गरजेचे होते. परंतु हे काम निद्रिस्त यंत्रणेकडून वेळेत, स्वतःहून न झाल्याने, सगळी कागदपत्रे घेऊन कोल्हापूरला शिक्षक व शिक्षकेतर कर्मचार्यांनाच खेटे मारावे लागले. हे संपूर्ण कामाकाज खरे तर शासकीय यंत्रणेचे होते. ही संपूर्ण प्रक्रिया शिक्षकांनी कोल्हापूर स्वखर्चाने वार्या करून पूर्ण केल्यावर मार्च एप्रिल चा पगार करण्यासाठी निधीच नसल्याची धक्कादायक बाब रत्नागिरीच्या वेतन अधीक्षिका किशोरी करमुसे सांगत आहेत.www.konkantoday.com




