गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायत पोटनिवडणुकांसाठी मंगळवारी मतदाननिवडणुक कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रात मतदानासाठी सुट्टी


रत्नागिरी, दि. 27 ) : जिल्ह्यातील गुहागर, संगमेश्वर, लांजा आणि राजापूर तालुक्यातील 13 ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी मंगळवार दि. 28 एप्रिल 2026 रोजी (सकाळी 7.30 वा. ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत) मतदान होणार आहे. मतदानाचा दिवस दि. 28 एप्रिल हा कामाचा दिवस असल्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुका जेथे नियोजित आहेत तेथील मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार वापर करुन सुट्टी जाहीर केली आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार ही सुट्टी निवडणुक कार्यक्रम लागू असलेल्या ग्रामपंचायत क्षेत्रापुरती राहणार आहे.

गुहागर तालुक्यात खोडदे, संगमेश्वर तालुक्यामध्ये साखरपा, कोंडगाव, तुरळ, राजिवली आणि ओझरखोल, लांजा तालुक्यात भडे, राजापूर तालुक्यात केळवली माडबन, भालावली, कळसावली, कोंड्ये तर्फे सौंदळ आणि धाऊलवल्ली अशा 13 ग्रामपंचायतींमध्ये पोट निवडणूका घेण्यात येत आहेत.

000

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button