गुहागर तालुक्यातील वेळणेश्‍वर येथे पोस्टमनचा प्रताप, दीड वर्षातील वाटप न केलेले टपाल पोस्टमनच्या घरात सापडले.


गेली दीड वर्षे पोस्टात जनतेसाठी तसेच येथील ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय, शाळा, हायस्कूल, महाविद्यालयासाठी आलेली टपाल पोस्टमनने वितरित केली नसल्याची धक्कादायक बाब गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. येथील ग्रामस्थांच्या वाढत्या तक्रारीवरून नव्याने रुजू झालेल्या पोस्टमास्तरने केलेल्या पाठपुराव्यामध्ये हा प्रकार समोर आला आहे. आता पोस्ट अधिकारी यावर कोणती कारवाई करतात याकडे लक्ष लागले आहे.
पोस्ट निरीक्षक हिमांशू जोशी यांनीही याबाबत पाहणी केली. तर शनिवारी सकाळी १० वाजता जिल्हा कार्यालयातूनही अधिकारी वर्ग वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये याप्रकरणी कार्यवाहीसाठी उपस्थित राहणार आहेत. विश्वासाचे प्रतिक असलेल्या पोस्टातील या घटनेमुळे वेळणेश्वर ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. तालुक्यातील वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये बीड येथील करन थोरात नामक पोस्टमन आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button