
विजयदुर्ग खाडीत ९ वी सरखेल कान्होजी आंग्रे जलतरण स्पर्धेत ११० स्पर्धकांचा सहभाग!____
विजयदुर्ग येथील खाडीत ९ वी सरखेल कान्होजी आंग्रे खुली जलतरण स्पर्धा नुकतीच मोठ्या उत्साहात पार पडली. श्री दुर्गामाता कला क्रीडा व सांस्कृतिक मंडळ, विजयदुर्ग आयोजित या स्पर्धेचे नियोजन कोल्हापूरच्या जिम स्विमिंग अकॅडमीने केले होते. या स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यातील ११० जलतरणपटूंनी सहभाग घेतला होता.
स्पर्धेचे उद्घाटन राज्य जलतरण संघटनेचे अध्यक्ष आनंद माने यांच्या हस्ते झाले. यावेळी रविकांत राणे, दीपक करंजे, अजय पाठक, ॲड. सुशील पाटील, कैलास आखाडे यांसह अन्य मान्यवर उपस्थित होते. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे सहभागी सर्व ११० स्पर्धकांनी आपली स्पर्धा यशस्वीपणे पूर्ण केली. यामध्ये रत्नागिरीच्या अवघ्या ४ वर्षांच्या इजहान कापडे याने ५०० मीटर अंतर पार करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
विविध वयोगटांत झालेल्या या स्पर्धेत मुलांच्या गटात आदेश जाधव (रत्नागिरी), हर्षवर्धन कर्लेकर (बेळगाव), अर्णव पिळणकर (रत्नागिरी), शौर्या राऊत (रत्नागिरी), वरून राज डोंगळे (कोल्हापूर), आदित्य बर्गे, भाग्येश पालव (सिंधुदुर्ग), करण मिलके (रत्नागिरी), राजू कलकुटगी (कोल्हापूर) आणि श्रीमंत गायकवाड (सातारा) यांनी आपापल्या गटात प्रथम क्रमांक पटकावला.
मुलींच्या गटात अद्विका गौडा (कर्नाटक), दूर्वा चव्हाण (कोल्हापूर), वैष्णवी शिरोडकर (गोवा), कृष्णा हार्व्याशी (कोल्हापूर), राजनंदिनी तिवले (कोल्हापूर), चैत्राली नवले (सातारा), तनया मिलके (रत्नागिरी), समिधा मोरे (ठाणे), गौरी मिलके (रत्नागिरी) आणि गायत्री फडके (पुणे) यांनी प्रथम क्रमांक मिळवला.
विजेत्यांना पांडुरंग रणखांब, ॲड. मोरे, ॲड. प्रवीण भंडारी व इतर मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. या स्पर्धेसाठी विजयदुर्ग बोटिंग, तालुका आरोग्य कार्यालय आणि स्थानिक ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले




