चीज ऍनालॉग’ वापरावर हॉटेल व रेस्टॉरंट यांना प्रशासनाचा कडक इशारा


रेस्टॉरंट, केटरर्स, हॉटेल्स तसेच फास्ट फूड विक्रेत्यांकडून अन्नपदार्थ तयार करताना ’चीज ऍनालॉग’चा वाढता वापर होत असल्याच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने महत्वपूर्ण पत्रक जारी करत संबंधितांना स्पष्ट सूचना दिल्या आहेत. ग्राहकांची दिशाभूल होऊ नये यासाठी वापरल्या जाणार्‍या घटकांची पारदर्शक माहिती देणे आता बंधनकारक करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ नुसार नागरिकांना सुरक्षित व शुद्ध अन्न मिळणे हा मूलभूत अधिकार आहे. या पार्श्वभूमीवर ’पनीर’, ’चीज ऍनालॉग’ यातील फरक स्पष्ट करताना प्रशासनाने सांगितले की, पनीर हे शुद्ध दुधापासून बनवलेले असते, तर चीज ऍनालॉग’ हे दूधाव्यतिरिक्त स्टार्च, इमल्सिफायर आदी घटक वापरून तयार केलेले पदार्थ असतात. त्यामुळे ते दिसायला पनीरसारखे असले तरी ते पनीर नसून स्वतंत्र वर्गातील पदार्थ आहेत.
पण काही ठिकाणी ’पनीर ऍ नालॉग’ किंवा ’चीज ऍनालॉ ग’ हे पदार्थ ’पनीर’ किंवा ’चीज’ या नावानेच विकले जाते. त्यामुळे ग्राहकांची फसवणूक होत असल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. यावर आळा घालण्यासाठी संबंधित व्यावसायिकांनी बिल, मेन्यू कार्ड तसेच इलेक्ट्रॉनिक डिस्प्ले बोर्डवर वापरल्या जाणार्‍या पदार्थाचा स्पष्ट उल्लेख करणे यापुढे आवश्यक आहे. तसेच अन्नपदार्थातील घटक, पोषणमूल्य व इतर माहिती ग्राहकांसमोर प्रदर्शित करणे बंधनकारक आहे. नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर अन्न सुरक्षा कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. ग्राहकांनी पनीर खरेदी करताना लेबल तपासावे, ’ऍनालॉग’ असा उल्लेख आहे का हे पाहावे, तसेच हॉटेलमध्ये ऑर्डर देताना पनीर आणि चीज ऍनालॉग वेगळे असल्याची खात्री करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button