
अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देणार्या आरोपीने खंडणीतील रकमेतून खरेदी केलेली कार जप्त
अश्लिल व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेकडून ६८ हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी येथील पोलिसांनी अटक केलेल्या गुलाम मोहिद्दीन रफिक परकार (३२, रा. साखरोली-खेड) या संशयिताच्या पत्नीचा मोबाईल पोलिसांनी हस्तगत केला आहे. खंडणीतील रकमेतून खरेदी केलेली ७ लाख रुपये किंमतीची नेक्सॉन कारही पोलिसांनी जप्त केली आहे. त्याचा पासपोर्टही पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. उकळलेली रक्कम हस्तगत करण्याचे येथील पोलिसांसमोर आव्हानच आहे.
एका महिलेशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत तिच्या अश्लील फोटोसह व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्याकडून वेळोवेळी ६८ लाख रुपयांची खंडणी उकळली. एवढी रक्कम देवूनही अटकेतील संशयिताने पैशासाठी पीडितेकडे तगादा लावला होता. रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर संशयिताने अश्लील फोटो थेट तिच्या पतीला पाठवत लगेच डिलिट केले होते.www.konkantoday.com



