मोठी बातमी! वडिलोपार्जित शेतजमिनीची दस्तनोंदणी फक्त १०० रुपयांत


वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप आता शेतकऱ्यांना जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार थेट दुय्यम निबंधक कार्यालयातून करता येणार आहे. याशिवाय शेतकऱ्यांना तालुक्यातील तहसीलदारांकडूनही कलम ८५ नुसार शेतजमिनीच्या वाटपाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहेवारसांना वडिलोपार्जित जमिनीचे वाटप करण्यासाठी यापूर्वी मालमत्तेचा मोठा हिस्सा वगळून उर्वरित हिश्श्याचे मूल्यांकन काढले जायचे. एकूण मूल्यांकनाच्या एक टक्का मुद्रांक शुल्क शासनाला भरावे लागत होते. ही रक्कम जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंत होती. मात्र, आता वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कुटुंबातील वारसांना करताना १०० रुपयांचे नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहेवारसांना वडिलोपार्जित जमिनीचे वाटप करण्यासाठी यापूर्वी मालमत्तेचा मोठा हिस्सा वगळून उर्वरित हिश्श्याचे मूल्यांकन काढले जायचे. एकूण मूल्यांकनाच्या एक टक्का मुद्रांक शुल्क शासनाला भरावे लागत होते. ही रक्कम जास्तीत जास्त ३० हजार रुपयांपर्यंत होती. मात्र, आता वडिलोपार्जित जमिनीचे वाटप कुटुंबातील वारसांना करताना १०० रुपयांचे नाममात्र शुल्क द्यावे लागणार आहे.तहसीलदारांकडून कलम ८५ नुसार शेतजमिनीच्या वाटपाचे आदेश झाल्यावर तलाठ्यांकडून त्या सातबारा उताऱ्यावर नोंद लावली जाते. मात्र, भूमिअभिलेख कार्यालयाकडून त्या वारसांचे नकाशे स्वतंत्र होण्यास विलंब लागत होता. आता दुय्यम निबंधक कार्यालयातून थेट ऑनलाईन सातबारा उताऱ्यावर वारसांची नावे लागणार आहेत. दुसरीकडे भूमिअभिलेख कार्यालयाकडून देखील ९० दिवसांत त्या वारसांना त्यांच्या मालमत्तेचे स्वतंत्र नकाशे मिळणार आहेत.

वडिलोपार्जित शेतजमीन वाटपासाठी शेतकऱ्यांना दोन पर्याय

जमीन महसूल संहिता १९६६ मधील कलम ८५ नुसार शेतकऱ्यांना त्यांच्या वारसांना वडिलोपार्जित शेतजमिनीचे वाटप करण्यासाठी दोन पर्याय आहेत. शेतकरी थेट तहसीलदारांकडूनही वाटपाचे आदेश घेऊ शकतात. मात्र, त्यावेळी सर्व वारसदार समोर उपस्थित राहावे लागतात. याशिवाय आता तेच शेतकरी तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात १०० रुपयांत दस्त नोंदणी करू शकणार आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button