पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज फेटाळला


राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारिशे याच्या खून प्रकरणातील मुख्य आरोपी पंढरीनाथ आंबेरकरचा जामीन अर्ज न्यायालयाकडून फेटाळून लावण्यात आला. यापूर्वी आंबेरकर याला ६ आठवड्यांचा अल्पकालीन जामीन न्यायालयाकडून मंजूर झाला होता. नुकतेच कारागृहात हजर होताच आंबेरकरने पुन्हा एकदा वैद्यकीय कारण देत जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. यावेळी न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळत आंबेरकरला पोलिसांच्या देखरेखीखाली उपचार घेण्यास सांगितले.
कशेळी येथील पत्रकार शशिकांत वारिशे याचा थार गाडीखाली चिरडून खून केल्याप्रकरणी पंढरीनाथ आंबेरकर यांच्याविरुद्ध भादंवि कलम ३०२ नुसार राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता ७ फेब्रुवारी २०२३ रोजी त्याला अटक करण्यात आली होती. आंबेरकर याने न्यायालयात एकूण चारवेळा जामीन अर्ज दाखल केले होते. त्यापैकी ३ अर्ज यापूर्वी फेटाळून लावण्यात आले. तर जानेवारी २०२६ मध्ये वैद्यकीय कारणास्तव आंबेरकरने जामीन अर्ज दाखल केला होता. या अर्जाचा मानवतेच्या दृष्टीने विचार करत न्यायालयाने ६ आठवड्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता.
दरम्यान, सहा आठवड्याचा जामीन कालावधी संपुष्टात येताच आंबेरकर कारागृहात हजर झाला. यावेळी पुन्हा एकदा आंबेरकर याने आपल्या आजारपणाचे कारण पुढे केले. आंबेरकर याच्यावतीने न्यायालयापुढे सांगण्यात आले की, आरोपी तीव्र उच्च रक्तदाब, मधुमेह या आजारांनी त्रस्त आहे. यामुळे वेदना होतात आणि मज्जातंतूंवर दबाव आल्यामुळे कंबर व पायांमध्ये मुंग्या येणे किंवा अशक्तपणा येऊ शकतो. न्यायालयाच्या आदेशानुसार सिव्हिल हॉस्पिटलच्या वैद्यकीय अधिकार्‍यांनी रक्त, लघवी तपासणी व सोनोग्राफी केली. त्यात आरोपीला किडनी स्टोन व पित्ताशयात खडे असल्याचे आढळले आहे.www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button