हातखंबा बीटची शिष्यवृत्ती सुपर बॅच सराव परीक्षा संपन्न

पाली : रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा बीट अंतर्गत येणार्‍या झरेवाडी, पाली, निवळी, खानू या केंद्राच्या अखत्यारीतील शाळांतील इयत्ता चौथीच्या परीक्षेला प्रविष्ट असणाऱ्या विद्यार्थ्यांची सुपर बॅच निवडून त्यांची सराव परीक्षा केंद्र शाळा पाली येथे नुकतीच झाली.
या सराव परीक्षेमध्ये केंद्रशाळा पाली, वळके, पाथरट, पाली क्र.२, नागलेवाडी, कशेळी, कशेळी कोंड, साठरे, केंद्रशाळा झरेवाडी, हातखंबा तारवेवाडी, वेळवंड कोठारवाडी, भोके आंबेकरवाडी या शाळांतील निवडक २५ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली.
या मुलांची निवड तालुकास्तरीय सराव परीक्षेतून उच्च स्तर गुण प्राप्त मुलांमधून निवड करण्यात आली होती.
या परीक्षेच्या यशस्वीतेसाठी बीटचे विस्तार अधिकारी दत्तात्रय सोपनूर, केंद्रप्रमुख विष्णू पवार, दत्तात्रय दरडी, लवेश गोरे, प्रशांत दुडये, स्नेहल तेंडुलकर, ममता सावंत, श्रद्धा रसाळ, महेश तेंडुलकर, दिगंबर तेंडुलकर, राजाराम खाकम, अस्मिता पाटील, स्नेहा ठाकरे, माधुरी शिंदेपाटील, विश्वनाथ गावडे, सुभाष काटकर, स्नेहा घुमा, अपूर्वा काळोखे या शिक्षकांनी अतिरिक्त वेळ देऊन मेहनत घेतली. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना परीक्षेचे कामकाज झाल्यानंतर प्रश्नपत्रिका सोडविताना वापरायच्या युक्त्या व तंत्र सांगून अधिक मार्गदर्शन केंद्रप्रमुख विष्णू पवार व तज्ञ शिक्षक, मार्गदर्शक मारुती घोरपडे यांनी केले.
२६ एप्रिल रोजी होणाऱ्या इयत्ता चौथीच्या पहिल्याच शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तम यशासाठी हातखंबा बीटमध्ये केंद्रप्रमुख विष्णु पवार यांच्या मुलगा ओंकार पवार याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला होता. या सुपर बॅचला अ‍ॅड. सागर पाखरे, पं. स. सदस्य नेताजी पाटील यांनी भेट देऊन या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे
कौतुक केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button