नेपाळी कामगाराचा आकस्मिक मृत्यू

रत्नागिरी, ता. २१ ः शहरानजीकच्या शीळ-कदमवाडी येथील आंबा काढणारा नेपाळी कामगार हा रात्री जेवण करुन झोपला. सकाळी त्याला उठविण्यासाठी गेले असता त्याची हालचाल दिसून आली नाही. उपचारासाठी त्याला जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता उपचारापुर्वीच त्यांचा मृत झाल्याचे तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून सांगितले. गोपाल रामफल डंगौरा थारु (वय २९, रा. कदमवाडी-शीळ, रत्नागिरी. मुळ रा. चुहा वार्ड क्र. ४, जिल्हा कैलाली, नेपाळ ) असे मृत नेपाळी तरुणाचे नाव आहे. ही घटना सोमवारी (ता. २०) सकाळी आठच्या सुमारास जिल्हा शासकीय रुग्णालयात घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मृत गोपा डंगौरा थारु हा राजेंद्र मोतीराम कदम यांच्या आंब्याच्या बागेत कामगार म्हणून कामाला होता. रविवारी (ता. १९) रात्री नऊ वाजता जेवण करुन झोपी गेला होता. सोमवारी सकाळी त्याला सोबतचे कामगार उठविण्यासाठी गेले असता त्याची हालचाल दिसून आली नाही. आंबा बाग मालक राजेंद्र कदम यांनी याबाबत पोलिस पाटील सोनिया कदम यांना माहिती दिली. तत्काळ त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला तपासून उपचारापुर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. शहर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button