संगमेश्वरात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ८ उमेदवार रिंगणात


संगमेश्वर तालुक्यात ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीसाठी सरपंच पदासाठी ८ तर सदस्य पदासाठी ४ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. कोंड असुर्डे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सोनल शिंदे या बिनविरोध निवडून आल्या आहेत. सदस्य पदासाठीच्या ९ उमेदवारांची बिनविरोध वर्णी लागली आहे.
तालुक्यात ५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी तर २८ सदस्य पदासाठी निवडणूक घेण्यात येत आहे. अर्ज सादर करण्याच्या कालावधीत सरपंच पदासाठी १२ तर सदस्य पदासाठी १६ अर्ज प्राप्त झाले होते. छाननीमध्ये सर्व अर्ज वैध ठरले. माघार दिनी सरपंच पद व सदस्यपदासाठी प्रत्येकी ३ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.
कोंडअसुर्डे सरपंचपदी सोनल शिंदे यांची बिनविरोध निवड झाल्याने आता ४ ग्रामपंचायतीत ८ उमेदवार विजयासाठी झुंजणार आहेत. साखरपा ग्रामपंचायतीत रश्मी साळसकर व भाग्यश्री सुर्वे, कोंडगाव ग्रामपंचायतीत रूपाली कीर व धनश्री जोशी, तुरळ ग्रामपंचायतीत नंदकुमार फडकले व रामचंद्र हरेकर तर राजिवली ग्रामपंचायतीत प्रगती शिर्के व राजेश शिर्के यांच्यात लढत होणार आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button