
देवरुख-साखरपा या मुख्य मार्गाची दैनावस्था
देवरुख-साखरपा या मुख्य मार्गाची दैनावस्था झाली आहे वाहनचालकांसह प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. खड्डेमय मार्गामुळे अपघात होण्याची दाट शक्यता आहे. तात्काळ या मार्गाची डागडुजी करणे गरजेचे आहे.
चार वर्षापर्वी संगमेश्वर देवरुख-साखरपा या मार्गाच रुंदीकरण व डांबरीकरण करण्यात आले. लाखो रुपयांचा निधी खर्ची पडूनही पहिल्याच पावसात वरचा थर गायब झाला, अन् वाहनचालक, प्रवाशांच्या नशीबी पुन्हा खड्डे आले. दरवर्षी केवळ खड्डे भरून प्रवाशांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम करण्यात आले. या मार्गाच्या दुरुस्तीसाठी आंदोलनेदेखील छेडण्यात आली. आमदार शेखर निकम यांनी पावसाळ्यानंतर मार्गाची दुरुस्ती केली जाईल, असे आश्वासन आमसभेत दिले होते.
अपघाताची वाट बघताय का? यानंतर काही ठिकाणी डांबर टाकून केवळ दिखाऊपणा करण्यात आला. पुन्हा मार्गावर खड्डे पडू लागले आहेत. देवरुख बनला आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.www.konkantoday.com



