आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त २५ रोजी व्याख्यानाचे आयोजन

रत्नागिरी : झाडगाव येथील श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळा, रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाच्या संयुक्त विद्यमाने आद्य शंकराचार्य जयंतीनिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.

हा कार्यक्रम शनिवारी (२५ एप्रिल) सायंकाळी ५ वाजता राणी लक्ष्मीबाई सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. वैशाख शुक्ल पंचमीला आद्य शंकराचार्य यांची जयंती असते. त्यानिमित्ताने आयोजित या कार्यक्रमात “आद्य शंकराचार्यांचा भक्तिमार्ग” या विषयावर प्रबोधनपर व्याख्यान होणार आहे. या व्याख्यानासाठी हभप संपदा निमकर या वक्त्या म्हणून उपस्थित राहणार आहेत.

व्याख्यात्या संपदा निमकर या मुंबई महानगरपालिकेच्या निवृत्त शिक्षिका असून २००५ पासून त्यांनी तीन वर्षे कीर्तन प्रशिक्षण दादर, विठ्ठल मंदिर येथे घेऊन कीर्तनालंकार पदवी प्राप्त केली आहे. नंतर १० वर्षे कीर्तन, प्रवचन सेवा करत आहेत. सध्या ८ वर्षे रत्नागिरीत सत्संग होते. इच्छुकांना विनामूल्य स्वगृही, श्रीमद् भागवत, भगवद्गीता, दासबोध, नारद भक्तीसूत्र आदी विषयांवर मार्गदर्शन करत आहेत.

आद्य शंकराचार्यांच्या विचारांचा प्रसार व त्यांच्या भक्तिमार्गाचे महत्त्व समजून घेण्यासाठी हा कार्यक्रम उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त रत्नागिरीकरांनी उपस्थित राहण्याचे आवाहन रत्नागिरी कऱ्हाडे ब्राह्मण सहकारी संघाचे अध्यक्ष माधव हिर्लेकर तसेच श्री गोविंद कृष्ण रानडे संस्कृत पाठशाळेचे अध्यक्ष वैद्य मंदार भिडे यांनी केले आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button