रत्नागिरीत जागतिक दर्जाचे तायक्वॉंदो रोलिंग मॅट व जनरेशन ३ सेंसर किट


पालकमंत्री उदय सामंतांच्या पुढाकारातून नवा क्रीडा अध्याय


रत्नागिरी जिल्ह्याच्या विकासासाठी अहोरात्र झटणारे आणि खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी कटिबद्ध असलेले राज्याचे उद्योग मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे रत्नागिरीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
भारतामध्ये प्रथमच आंतरराष्ट्रीय दर्जाची ‘लेव्हल-३ तायक्वॉंदो रोलिंग मॅट’ रत्नागिरी तालुक्यात उपलब्ध करून देण्यात आली असून, या उपक्रमामुळे जिल्ह्याच्या क्रीडा वैभवात मोलाची भर पडली आहे.
ग्रामीण भागातील खेळाडूंमध्ये जागतिक स्तरावर चमकण्याची प्रचंड क्षमता असूनही त्यांना योग्य सुविधा व क्रीडा साहित्य मिळत नाही, ही उणीव ओळखून पालकमंत्री सामंत यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्याचाच हा सकारात्मक परिणाम असून, अशा प्रकारची अत्याधुनिक मॅट व जनरेशन थ्रीचे सेन्सर किट रत्नागिरी तालुक्यात उपलब्ध झाली आहे.
या ‘लेव्हल-३’ मॅट व सेंसर कीट मुळे आता रत्नागिरी तालुक्यातील खेळाडूंना जागतिक दर्जाचा सराव करण्याची संधी मिळणार आहे. या मॅटचे उद्घाटन १८ एप्रिल रोजी बॅडमिंटन हॉल छत्रपती शिवाजी महाराज स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स मारुती मंदिर येथे उद्योगमंत्री उदय सामंत, जिल्हा क्रीडा अधिकारी विजय शिंदे, सुरेश मयेकर, तालुकाप्रमुख बंड्या साळवी, नगरसेवक सौरभ मलुष्टे, अमित विलणकर, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश रसाळ, शहरप्रमुख बिपीन बंदरकर, स्नेहा माने तायक्वांदो प्रशिक्षक प्रशिक्षक शाहरुख शेख, प्रशांत मकवाना, मिलिंद भागवत यांच्या उपस्थितीत संपन्न झाले.
या कार्यक्रमासाठी एसआरके व गणराज तायक्वांदो क्लबचे पदाधिकारी खेळाडू व पालक उपस्थित होते.
या ऐतिहासिक कामगिरीबद्दल तायक्वांदो असोसिएशन ऑफ महाराष्ट्रचे अध्यक्ष डॉ. अविनाश बारगजे, महासचिव मिलिंद पठारे, कोषाध्यक्ष व्यंकटेश्वरराव कररा, सचिव सुभाष पाटील, शिवछत्रपती पुरस्कार विजेते प्रवीण बोरसे, धुलीछंद मेश्राम, रत्नागिरी जिल्ह्याचे सचिव लक्ष्मण कररा, कोषाध्यक्ष शशांक घडशी उपाध्यक्ष विश्वदास लोखंडे यांनी पालकमंत्र्यांचे आभार मानले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button