एकनाथ शिंदे आणि चाकणकरांचे आभार मानले पाहिजेत; खरात प्रकरणावर प्रा. श्याम मानव यांचा खळबळजनक आरोप!


भोंदू खरात प्रकरण घरोघरी पोहोचण्यासाठी एकनाथ शिंदे यांचे आभार मानले पाहिजे. या प्रकरणात एकनाथ शिंदे यांचे संबंध आणि रूपाली चाकणकर त्या भोंदू बाबाची भक्त नसती तर हे प्रकरण कधीच उघडकीस आले नसते. कदाचित पोलिसांनाच हे प्रकरण त्यांच्या पातळीवर दाबून टाकण्याच्या सूचना आल्या असत्या, असा खळबळजनक आरोप अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राष्ट्रीय संघटक प्रा. श्याम मानव यांनी केला.

अंनिसच्यावतीने अकोल्यातील मराठा मंडळ कार्यालयात बुवाबाजी विरोधी परिषदेत ते बोलत होते. प्रा. श्याम मानव यांनी बुवाबाजीवर कठोर शब्दात प्रहार करून खरात प्रकरणात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत.

… तर पोलिसांच्या पातळीवरच प्रकरण दाबले गेले असते

प्रा. श्याम मानव म्हणाले, “भोंदू अशोक खरात प्रकरणाशी एकनाथ शिंदे यांचे संबंध असल्याने त्याचा सखोल तपास सुरू झाला. एकनाथ शिंदे यांचा तो बाबा नसता आणि अजित पवारांच्या गटातील रूपाली चाकणकर याची भक्त नसती तर कधीच हा प्रकार उघड झाला नसता. हे प्रकरण पोलिसांनी त्यांच्या पातळीवर दाबवून टाकावे, अशा सूचना दिल्या गेल्या असत्या, असे आरोप श्याम मानव यांनी केले.

मित्र पक्षांना धडा शिकवण्यासाठीच…

एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादीला धडा शिकवण्यासाठी हे प्रकरण सखोल हाताळण्याच्या सूचना पोलिसांना मिळाल्या आहेत. एकनाथ शिंदे, रूपाली चाकणकर यांच्यासारख्या मित्र पक्षातल्या नेत्यांचा संबंध खरातशी समोर आल्यामुळे या प्रकरणाचा तपास करू दिला जात आहे, असा गंभीर आरोप श्याम मानव यांनी केला. भोंदू अशोक खरातचे आयपीएस महिला अधिकारी आणि इतर अनेक अधिकारी शिष्य आहेत. हा खरात विविध माध्यमातून एखाद्या व्यक्तीची गुप्त माहिती काढत होता. त्यानंतर स्वतःचे बनावट प्राप्तिकर अधिकारी पाठवून धाडी टाकत होता. त्या माध्यमातून पैसे उकळत होता. त्यावेळी कुणीही पोलीस अधिकाऱ्यांसह राजकीय पुढाऱ्यांनी हस्तक्षेप केला नाही, असेही ते म्हणाले.

महिलांना भीती दाखवणारे बाबा मूर्ख

जे बाबा महिलांना भीती दाखवतात ते मूर्ख आहेत. बाबाला काहीही करायची गरज नाही, फक्त जाहीर करायचं ‘मी गुरु आहे तुमचा’, बसं सगळं संपलं. सर्व आयतं उपलब्ध होत, नंबर लागत नसल्याची परिस्थिती राहते. महिलेची छेड काढली तर हाणामारीचे प्रसंग येतात आणि याचं देशात हजारोच्या संख्येने महिला स्वतःला बाबाला अर्पण करीत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button