गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या आरोपीला तब्बल चार वर्षांनंतर गुजरात येथून पोलिसांनी घेतले ताब्यात


रत्नागिरी तालुक्यातील करबुडे येथे गॅस टँकरमधून गॅस चोरी करणाऱ्या आरोपीच्या गुजरात येथून मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. रत्नागिरी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली असून, तब्बल चार वर्षांनंतर रत्नागिरी पोलिसांना हा आरोपी पकडण्यात यश आले आहे. बुधाराम रामलाल (४२) असे पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सन २०२२ मध्ये करबुडे येथे गॅस टँकरमधून गॅस चोरी झाली होती. यासंदर्भात ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गोपनीय आणि तांत्रिक माहितीच्या आधारे बुधाराम रामलाल हा गुजरातमध्ये असल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे एक पथक तयार करण्यात आले. या पथकाने गुरुवारी रात्री बुधाराम रामलाल याला गुजरात येथून ताब्यात घेतले.
जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अपर पोलीस अधीक्षक बी. बी. महामुनी, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस फौजदार बाळू जाधवर, पोलिस हेडकॉन्स्टेबल विनायक राजवैद्य, बाळू पालकर आणि रमीज शेख यांनी केली आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button