जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरीतर्फे मोफत चष्मे वाटप शिबिर

रत्नागिरी : येथील जायंट्स ग्रुपतर्फे पिंपळवाडी, बागकर मंडळ, भाटी मिऱ्या येथे नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. या उपक्रमासाठी जवळपास १५० गरजू रुग्णांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील शंभरच्या वर गरजूंची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील मार्गदर्शन करण्यात आले.
या उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला. असे शिबिर पुन्हा आयोजित करण्याची इच्छा उपस्थित नागरिकांनी व्यक्त करून या कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले. कार्यक्रमासाठी नूतन सदस्य आणि पुराणिक ब्रदर्स ऑप्टिशियनचे संजय पुराणिक आणि त्यांचे सहकारी प्रसाद तुपे, सार्थक पुराणिक, संजना वीर यांनी विशेष मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले.
ग्रुपचे अध्यक्ष महेश दामले तसेच माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भुते यांनी आणि बागकर मंडळाने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. जायंट्स फेडरेशनचे स्पेशल कमिटी मेंबर मिलिंद सावंत, संजय पाटणकर तसेच सदस्य सचिन बारटक्के, सुनील सहस्रबुद्धे, विनय जोशी, भरत इदाते, प्रसन्न मुळे आदी सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button