ठाकरे शिवसेनेच्या वतीने एलईडी मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शुक्रवारी शहरातून मोर्चा


एलईडी मासेमारी बंद झाली पाहिजे… एलईडी बोट धारकांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या सत्ताधाऱ्यांचा निषेध असो… मच्छीमारांना सवलतीच्या दराने डिझेल मिळायला हवे… एलईडी मासेमारी बंद करा अन्यथा खुर्ची खाली करा…

समुद्र आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा’, अशा विविध घोषणा देत ठाकरे शिवसेनेच्या वतीने एलईडी मासेमारी आणि डिझेल दरवाढी विरोधात शुक्रवारी शहरातून मोर्चा काढण्यात आला.

माजी आमदार वैभव नाईक, माजी आमदार परशुराम उपरकर यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या या मोर्चात सहाय्यक मत्स्य व्यवसाय आयुक्त सागर कुवेसकर यांना निवेदन सादर करून एलईडीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button