
अक्षरगंगा प्रज्ञाशोध परिक्षेत शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडीचे यश
रत्नागिरी तालुक्यातील जि.प.प्रा.शाळा कोतवडे घारपुरी सनगरेवाडी शाळेतील विद्यार्थी अक्षरगंगा प्रज्ञाशोध परीक्षेत गुणवत्ता यादीत आले असून यात सिद्धी विनोद राणे इ.२री हिचा रत्नागिरी जिल्ह्यात ५वा तर कुणाल आशिष शिंदे (इ.३री) हा केंद्रस्तरीय गुणवत्ता यादीत दुसरा आला आहे.
या दोन्ही विद्यार्थ्यांचे मुख्याध्यापिका श्रीम.अनुजा केळकर, उपशिक्षक श्री.राजेश पवार, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा रिया राणे, उपाध्यक्षा श्रीम.श्वेता सनगरे,माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री.तेजेष शिवलकर, उपाध्यक्ष श्री.प्रसाद राणे,
सामाजिक कार्यकर्ते श्री.सुहास शितप,समीर आठवले,प्रविण सांडीम, गावातील जेष्ठ नागरिक रमाकांत वारेकर आदींनी अभिनंदन केले आहे.
शाळेची गुणवत्ता याप्रमाणेच अधिक बहरत राहो आणि तिचा लौकिक अधिक वाढत राहो यासाठी
सर्वजण विद्यार्थी आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन करत आहेत.




