
दापोली-लाडघर मार्गावर रिक्षा २० फूट खोल कोसळली, 3 जखमी
-दापोली तालुक्यातील दापोली–लाडघर मार्गावर एक रिक्षा सुमारे २० फूट खोल दरीत कोसळली चंद्रनगर उतार परिसरात अपघाताची घटना घडली या अपघातात तीनजण जखमी झाले
प्रभुआळी येथील चंद्रकांत खंडाळे यांच्या मालकीची रिक्षा लाडघरकडे जात होती. चंद्रनगर उतारावरून खाली उतरत असताना चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. उतार तीव्र असल्याने रिक्षा थेट रस्त्याच्या कडेला जाऊन सुमारे २० फूट दरीत कोसळली.
अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. दरीत उतरून त्यांनी रिक्षेत अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचे धाडसी प्रयत्न केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे जखमींना लवकर बाहेर काढण्यात यश आले.
या अपघातात शामल चंद्रकांत खंडाळे (वय ३८) आणि विकास बाळाराम बैकर (वय ३९) हे जखमी झाले आहेत. दोघांनाही तात्काळ उपचारासाठी दापोली उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.



