
नागरी संरक्षण दलाच्यावतीने रनपार येथे गुरुवारी विशेष ‘मॉकड्रिल’
रत्नागिरी, दि. ८ ):- आपत्ती काळात नागरिकांचे संरक्षण आणि विविध यंत्रणांमधील समन्वय तपासण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागांतर्गत येणाऱ्या ‘नागरी संरक्षण दल’ (Civil Defence) वतीने फिनोलेक्स पाईप ॲण्ड फिटींग्स, रनपार येथे एका विशेष ‘मॉकड्रिल’चे (प्रात्यक्षिक सराव) आयोजन करण्यात आले असल्याचे नागरी संरक्षण दल उपनियंत्रक निवृत्त ले. कर्नल प्रशांत चतुर यांनी कळविले आहे.
हे प्रात्यक्षिक गुरुवार, ९ एप्रिल २०२६ रोजी आयोजित करण्यात आले आहे. फिनोलेक्स पाईप ॲण्ड फिटींग्स, रनपार येथे हा प्रात्यक्षिक सराव संपन्न होणार असून दुपारी १ ते ३ वाजता आणि रात्रौ ७ ते ९ वाजता या वेळेत हे मॉकड्रिल पार पडणार आहे.
या कवायतीमध्ये जिल्ह्यातील नागरी संरक्षण दल स्वयंसेवक, गृहरक्षक दल, पोलीस कृतीदल NCC कॅडेट, NCC चे विद्यार्थी, श्वान पथक, अग्निशमन दल, तटरक्षक दल व आपत्ती व्यवस्थापन आपदा मित्र इत्यादींचा समावेश असणार आहे.
या उपक्रमाच्या यशस्वीततेसाठी परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात येत आहे.0000




