चिपळूण शहरात दुचाकी न दिल्याच्या रागातून बेदम मारहाण


दुचाकी न दिल्याच्या रागातून एकाने लोखंडी पाईपसे श्रीकांत श्रीपात सावंत (४५, कापसाळ-मोरेवाडी) यांना बेदम मारहाण केल्याची घटना काही दिवसांपूर्वी चिपळूण शहरातील पाग पॉवरहाऊस येथे घडली. यात श्रीकांत सावंत जखमी झाले असून मारहाण करणार्‍या राकेश गोरिवले याच्यावर चिपळूण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतची फिर्याद श्रीकांत सावंत यांनी दिली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार २७ मार्च रोजी श्रीकांत सावंत हे वेल्डींग दुकानात ट्रकचे काम करण्यासाठी गेले होते. त्यावेळी राकेश गोरिवले हा सावंत सांच्या जवळ येऊन त्यांच्याकडे दुचाकीची मागणी केली. मात्र त्यांनी त्याला नकार दिला. या गोष्टीचा राग मनात धरून राकेश याने सावंत यांना लोखंडी पाईपने डोक्यात व हातापायावर मारहाण केली. शिवीगाळ करत ठार मारण्याची धमकी दिली. यात त्यांना दुखापत झाली आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button