अखेर सात वर्षापासून बंद असलेले खेड बसस्थानकातील उपाहारगृह प्रवाशांसाठी खुले


गेल्या सहा ते सात वर्षांपासून बंद स्थितीत असलेले खेड बस स्थानकातील उपाहारगृह शुक्रवार दि. ३ एप्रिल २०२६ पासून प्रवाशांसाठी खुले झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
खेड बसस्थानक हे दापोली आणि मंडणगड तसेच तालुक्यातील ग्रामीण भागात जाणार्‍या लोकांसाठी एक मध्यवतीं बसस्थानक आहे. कोरोना कालावधीनंतर प्रवाशी संख्या कमी झाल्यामुळे उपहारगृह चालवणे कठीण झाले होते. ग्राहक नसल्यामुळे उपाहारगृह चालविणे कठीण बनले होते. त्यातच एस्टी महामंडळाचे भाडे हे परवडणारे नसल्याने गेल्या ६/७ वर्षांपासून हे उपाहारगृह बंद स्थितीत होते. याबाबत सातत्याने प्रवाशांनी आवाज उठवल्यानंतर तसेच एस्टी महामंडळाचे भाडे अतिरिक्त असल्याचे पटवून दिल्यानंतर अधिकार्‍यांनी याबाबतचा विचार करून होणारे नुकसान टाळण्यासाठी व उपाहारगृह पुन्हा चालू होण्यासाठी सदर भाडे कमी करून प्रसिद्ध केलेल्या निविदेला मिळालेल्या प्रतिसादानंतर शुक्रवार दि एप्रिल २०२६ रोजी उपाहारगृह सुरू झाल्याने प्रवाशांनी समाधान व्यक्त केले आहे.
www.konkantoday.com

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button