
दापोली शहर बाजारपेठेत भीषण आग… पाच दुकाने आगीच्या भक्षस्थानी; लाखो रुपयांचे नुकसान
नागरिक व युवकांच्या सतर्कतेमुळे आग आटोक्यात
नगरपंचायत कर्मचारी अमित रेमजे यांचे प्रसंगावधान
दापोली प्रतिनिधी
दापोली शहर बाजारपेठेत हॉटेल सन्मान समोर बिपिन कॉर्नरला शनिवारी रात्री उशिरा साडेदहाच्या सुमारास भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली. या आगीत मोबाईल शॉपी ज्वेलरी आदी एकूण एकूण पाच दुकाने आगीच्या भक्षस्थानी पडली. यामध्ये दुकानांचे लाखो रुपयांचे मोठे नुकसान झाल आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही. शहर शिवसेना शाखेजवळ असलेल्या काही नागरिकांनी जवळच्या दुकानातून येणारा धूर पाहून हा सगळा प्रकार लक्षात आला. शहर शिवसेना शाखेजवळील युवकांनी नागरिकांनी सतर्कता बाळगत तात्काळ मदत कार्य सुरू केलं. त्यावेळी शहर बाजारपेठ येथील श्री पंचमुखी मारुती मंदिराच्या कार्यक्रमासाठी योगायोगाने उपस्थित असलेले दापोली नगरपंचायतीचे कर्मचारी अमित रेमजे यांनी तात्काळ नगरपंचायत कार्यालयात जाऊन फायर बुलेट घेऊन ते घटनास्थळी दाखल झाले. धोपट पाणीवाले , संदीप दिनेश दिनेश नायक, नितीन शिंदे,अपी मोरे आदी नागरिकांनी आग विझवण्यासाठी तात्काळ पाण्याची व्यवस्था केली. नगरपंचायतीच्या फायर बुलेट ला पाणी पुरवण्याचे मोठं काम माजी सरपंच दिनेश नायक यांनी केलं.
शहर बाजारपेठेतील नागरिकांनी युवकांनी धाडस दाखवून घटनास्थळी तात्काळ धाव घेऊन तात्काळ मदत कार्य सुरू केल्याने आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आलं आहे सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झालेली नाही शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. घटनास्थळी दापोली शहर परिसरातील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती
दापोली नगरपंचायत प्रशासनाकडे अग्निशामक बंब नसल्याने मोठी गैरसोय निर्माण झाली अखेर खेड नगरपरिषदेकडून अग्निशमक बंब बोलावण्यात आला. मात्र खेड येथून अग्निशामक बंब येईपर्यंत दापोली शहर परिसर व बाजारपेठेतील युवकांच्या नागरिकांच्या मोठ्या तात्काळ मदतीमुळे ही आग आटोक्यात आणण्यात मोठे यश आलं अन्यथा मोठा अनर्थ घडण्याची शक्यता होती. मात्र या भीषण आगीत सुमारे पाच दुकानांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. घटनास्थळी नगरपंचायत कर्मचारी महसूल कर्मचारी व पोलिसांनीही धाव घेतली. रात्री उशिरा खेड नगर परिषदेचा अग्निशामक बंबही घटनास्थळी दाखल झाला होता
चौकट
दापोली नगरपंचायतीच्या कर्मचारी अमित रेमजे या कर्मचाऱ्याने तो बाजारपेठेतच योगयोगाने मारुती मंदिरात बाजारपेठेतच असल्याने त्यांन तात्काळ सतर्कता बाळगत नगरपंचायत कार्यालयात जाऊन तात्काळ फायर बुलेट घटनास्थळी आणून खूप मोठी मदत केली. विशेष म्हणजे फायर बुलेट चालवण्याचा कोणताही अनुभव नसताना त्यान केलेले धाडस मोठ आहे.
अग्निशामक बंबासाठी शासन स्तरावर पाठपुरावा सुरू लवकरच पूर्तता होईल
नगराध्यक्ष कृपा घाग यांची प्रतिक्रिया
2015 पासून दापोली नगरपंचायतीकडून अग्निशमन बंबगाडी घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. मात्र दापोली शहर परिसरातील अंतर्गत रस्ते लहान असल्याने आपल्याला हवे तसे छोटे सुविधायुक्त वाहन घेता यावे यासाठी प्रयत्न सुरू आहेत यासाठी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्याकडूनही नगरविकास खात्याकडे पाठपुरावा सुरू आहे. शासन निर्णयानुसार दापोली नगरपंचायत करिता अग्निशमन वाहन खरेदी करण्याची कार्यवाही शासन स्तरावर ( महाराष्ट्र अग्निशमन संचालनालय मुंबई ) सुरू आहे. लवकरच अग्निशामक बंबगाडीची पूर्तता केली जाईल अशी प्रतिक्रिया दापोलीच्या नगराध्यक्ष कृपा घाग यांनी दिली आहे
दरम्यान आगीत भक्षस्थानी पडलेल्या दुकानांच्या नुकसानीचा पंचनामा करण्याचे काम दापोली तालुका महसूल विभागाकडून तात्काळ सुरू करण्यात आल आहे



