
लांजा-मठ येथील रेल्वे मार्गावर रेल्वेतून पडून तरुणाचा मृत्यू
रेल्वेतून खाली रेल्वे ट्रॅकवर पडल्याने ३१ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी २ एप्रिल रोजी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास कोकण रेल्वे मार्गावर मठ गांगरकरगाव येथे घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रितु कुमार राजेंद्र दास असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव असून तो (हरपूर बोचहा, समस्तीपुर, विद्यापतीनगर, बिहार) येथील रहिवासी आहे. तो रेल्वे मध्ये बसून गोवा ते समस्तीपुर बिहार असा चालला होता. ही रेल्वे कोकण रेल्वे मार्गावर लांजा तालुक्यातील मठ गांगरकर गाव येथे आली असता धावत्या चालत्या रेल्वेमधून खाली पडला. त्याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर दुखापत झाली.www.konkantoday.com




